रचना क्र. 384
हाती वाजवूया टाळी
श्री पेठेकाका · null
null
हाती वाजवूया टाळी ।
करू नामाची दिवाळी ॥१॥
अवघे हरिले या विठ्ठले ।
उरले तेही देऊ भले ॥२॥
प्रपंच केला अपुला रिता ।
चला भेटूया भगवंता ॥३॥
आड येत जे जे होते ।
नेले दयाळू भगवंते ॥४॥
आता रोज सणवार ।
नाही आनंदाला पार ॥५॥
दीन म्हणे नामस्मरणे ।
संतसंगे जगणे, जाणे ॥६॥
