रचना क्र. 363
नर नारी बाळे अवघा नारायण
श्री तुकोबा · null
null
नर नारी बाळे अवघा नारायण । ऐसे माझे मन, करी देवा ॥१॥
नको काम क्रोध, द्वेष निंदा द्वंद्व । अवघा गोविंद निःसंदेह ॥२॥
असावे म्या सदा विषयी विरक्त । काया वाचा चित्त तुझे पायी ॥३॥
करोनिया साह्य, पुरवी मनोरथ । व्हावे कृपावंत तुका म्हणे ॥४॥
