रचना क्र. 364
विटेवरी ज्याची पाउले समान
श्री तुकोबा · null
null
विटेवरी ज्याची पाउले समान ।
तोचि एक दानशूर दाता ॥धृ॥
सेवितो रस तो वाटितो आणिका ।
घ्या रे होऊ नका रानभरी॥१॥
मनाचे संकल्प पाववील सिद्धी ।
जरी राहे बुद्धी याचे पायी ॥२॥
तुका म्हणे मज धाडिले निरोपा ।
मारग हा सोपा सुखरूप ॥३॥
