रचना क्र. 361
प्रेम नाही त्याची
श्री जयरामनाना महाराज · null
null
प्रेम नाही त्याची, टाकावी संगती ।
कासयासी प्रीती उदासाची ॥धृ॥
उदास अंतरी काहीच बोलेना ।
त्यासी विचारणा करू नये ॥१॥
करू नये वाद, चुकवावी भेट ।
कधीही वाईट बोलू नये ॥२॥
बोलावे निर्मळ निर्मळाजवळी ।
लोका तारांबळ सांगू नये ॥३॥
सांभाळावी वेळ स्वतः स्वहिताची ।
प्रीती विठ्ठलाची जयरामा ॥४॥
