रचना क्र. 360
श्री ब्रह्मानंदांची आरती (बेलधडी)
श्री पेठेकाका · null
null
ओवाळू आरती गुरुवर ब्रह्मानंदांसी ।
आज्ञापालन, त्याग, विरक्ती, सेवाकार्यासी ॥धृ॥
बनशंकरिने प्राण वाचवुनि दिधले दर्शन ।
वेद, शास्त्र, वक्तृत्व, पुराणे झाला संपन्न ।
नश्वरतेने ईशप्राप्तिचे करुनि दिले स्मरण ।
मार्गदर्शना वेंकटापती झाले अवतीर्ण ॥१॥
म्हणती सद्गुरुविण ना गति रे, जा गुरुसी शरण ।
तेच पुन्हा श्री दत्तगुरूंनी करुनि दिले स्मरण ।
महाराज गुरु लाभताच तव सार्थक जीवन ।
उद्धरता नामाचे कळुनी आले महिमान ॥२॥
गुरुआज्ञेने पदव्या विद्या दिधल्या सोडून ।
नामासाठी जगला श्रींना प्रमाण मानून ।
ज्ञानोत्तर भक्ती अन् निष्ठा अनन्य ठेवून ।
ती निष्ठा दीनांस लाभु दे द्या इतुके दान ॥३॥
