रचना क्र. 349
क्षणक्षणा हा चि
श्री तुकोबा
क्षणक्षणा हा चि करावा विचार ।
तरावया पार भवसिंधु ॥धृ॥
नाशिवंत देह जाणार सकळ ।
आयुष्य खातो काळ सावधान ॥१॥
संतसमागमीं धरूनि आवडी ।
करावी तांतडी परमार्थी ॥२॥
तुका म्हणे यहलोकींच्या वेव्हारें ।
नये डोळे धुरें भरूनि राहों ॥३॥
