रचना क्र. 348
त्रैलोक्य पाळिता
श्री तुकोबा · null
null
त्रैलोक्य पाळिता उबगला नाही ।
आमचे त्या काई असे ओझे ॥धृ॥
पाषाणाचे पोटी बैसला दर्दुर ।
तया मुखी चार कोण घाली ॥१॥
पक्षी अजगर न करी संचित ।
तयासि अनंत प्रतिपाळी ॥२॥
तुका म्हणे तया भार घातलीया ।
उपेक्षीना दयासिंधु माझा ॥३॥
