रचना क्र. 347
जैसा भाव तैसे फळ
श्री तुकोबा
जैसा भाव तैसे फळ ।
स्वाति तोय एक जळ ॥धृ॥
देखण्याच्या तीन जाती ।
वेठी, वार्ता, अत्यंती ॥१॥
पाहे, सांगे आणि जेवी ।
अंतर महदांतर तेवी ॥२॥
तुका म्हणे एक हिरा ।
पारखिया, मूढा गारा ॥३॥
रचना क्र. 347
श्री तुकोबा
जैसा भाव तैसे फळ ।
स्वाति तोय एक जळ ॥धृ॥
देखण्याच्या तीन जाती ।
वेठी, वार्ता, अत्यंती ॥१॥
पाहे, सांगे आणि जेवी ।
अंतर महदांतर तेवी ॥२॥
तुका म्हणे एक हिरा ।
पारखिया, मूढा गारा ॥३॥