रचना क्र. 345
भजता चित्ता शंकरचरणा
श्री रामकृष्णानंद महाराज
भजता चित्ता शंकरचरणा ।
पावन करि शिव पतिता दीना ॥धृ॥
जिवाशिवावेगळाचि शिव हा ।
त्यासी शिवता शिवमय जिव हा ।
बाह्यांतरी शिव सुखमय भव हा ।
शिवसंगम होता शिवस्वये हा ॥१॥
विश्वंभर पोषिसि मम जीवा ।
करिं बाहिरु विश्वाला अथवा ।
उभया भावे सोडि न नाथा ।
विश्वंभर विश्वेशा देवा ॥२॥
विहित न केले, अविहित घडले ।
विहितापरि जाणुनि आचरिले ।
शिवनामे अवघे अघ हरिले ।
गोविंदज रामे मुखि स्मरले ॥३॥
