रचना क्र. 343
करि रे हरिच्या जागरणा
श्री पेठेकाका · null
null
करि रे हरिच्या जागरणा ।
मनुजा, हरिच्या जागरणा ॥धृ॥
दुष्कर्मांची चाले चलती ।
सत्कर्मांना साथ कमी किती ।
कलिच्या ओळख खुणा । मनुजा ॥१॥
हरिच्या जागरणा..
देव दूर किती अभक्त नेती ।
लोभे मोहे दुःखी पडती ।
कलिच्या ओळख खुणा । मनुजा ॥२॥
हरिच्या जागरणा..
काळ न हाती, बुद्धी न हाती ।
टिकेल का ती नसे शाश्वती ।
कलिच्या ओळख खुणा । मनुजा ॥३॥
हरिच्या जागरणा..
देवजागृती हीच एक गति ।
दीन म्हणे ती धरि रे हाती ।
कलिच्या जाणुन खुणा । मनुजा ॥४॥
हरिच्या जागरणा..
