रचना क्र. 341
ऐसे कैसे रे सोवळे
श्री रामदास स्वामी
ऐसे कैसे रे सोवळे ।
सिवता होतसे ओवळे ॥धृ॥
स्नान संध्या टिळे माळा ।
पोटी क्रोधाचा उमाळा ॥१॥
नित्य दंडिता हा देहो ।
परि फिटेना संदेहो ॥२॥
बाह्य केली झळफळ ।
देह बुद्धिचा विटाळ ॥३॥
नित्यनेम खटाटोप ।
मनी विषयांचा जप ॥४॥
रामदासी दृढ भाव ।
रामाविणे सर्व वाव वाव ॥५॥
(संपादित)
