रचना क्र. 336
करिसी न करिसी
श्री तुकोबा · null
null
करिसी न करिसी माझा अंगीकार ।
हा मज विचार पडिला देवा॥धृ॥
देसी की न देसी पायांचे दर्शन ।
म्हणऊनी मन स्थिर नाही ॥१॥
बोलसी की न बोलसी मजसवे देवा।
म्हणोनिया जीवा भय वाटे॥२॥
होईल की न होय तुज माझा आठव ।
पडिला संदेह हाचि मज ॥३॥
तुका म्हणे मी तो कमाईचे हीण ।
म्हणऊनी शीण करी देवा ॥४॥
