रचना क्र. 335
जैसे तैसे राहे
श्री तुकोबा · null
null
जैसे तैसे राहे देवाचे हे देणे ।
यत्न करिता तेणे काय नव्हे ॥धृ॥
दासा कृपासिंधू नुपेक्षी सर्वथा ।
अंतरीची व्यथा कळे त्यासी ॥१॥
मागो नेणे परि माय जाणे वर्म ।
बाळा नेदी श्रम पावो काही ॥२॥
तुका म्हणे मज अनुभव अंगे ।
वचन वाउगे मानेना हे ॥३॥
