रचना क्र. 334
माकडेमुठी धरिले फुटाणे
श्री तुकोबा · null
null
माकडेमुठी धरिले फुटाणे ।
गुंतले ते नेणे हात तेथे ॥धृ॥
काय तो तयाचा लेखावा अन्याय ।
हित नेणे काय आपुले ते ॥१॥
शुके नळिकेशी गोवियेले पाय ।
विसरोनि जाय पक्ष दोन्ही ॥२॥
तुका म्हणे एक ऐसे पशुजीव ।
नचले उपाव काही तेथे ॥३॥
