रचना क्र. 333
देव घ्या कुणी देव घ्या
श्री तुकोबा · null
null
देव घ्या कुणी देव घ्या ।
आइता आला घर पुसोनि ॥धृ॥
देव नलगे देव नलगे ।
साठवणेचे रुधले जागे ॥१॥
देव मंदला मंदला ।
भाव बुडाला काय करू ॥२॥
देव घ्या फुका देव घ्या फुका।
न लगे रुका मोल काही॥३॥
दुबळा तुका भावेविणे ।
उधारा देव घेतला ऋणे ॥४॥
