रचना क्र. 332
संतांसी क्षोभवी
श्री तुकोबा
संतांसी क्षोभवी कोण्याही प्रकारे ।
त्याचे नव्हे बरे उभयलोकी ॥धृ॥
देवाचा तो वैरी शत्रु दावेदार ।
पृथ्वीही थार नेदी तया ॥१॥
संतांपाशी ज्याचा नुरेचि विश्वास ।
त्याचे जाले दोष बळिवंत ॥२॥
तुका म्हणे क्षीर वासराच्या अंगे ।
किंवा धावे लागे विषमे मारू॥३॥
