रचना क्र. 306
श्री ज्ञानेश्वरांची आरती
श्री पेठेकाका · null
null
जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर ।
योग्यांची माउली, भक्तांची सावली, देव साकार ॥
जय देव जय देव ॥धृ॥
भक्तीचा कैलास, ज्ञानसागर ।
ज्ञानेश्वर माझा प्रेमपाखर ।
ज्याला त्याला वाटे अपुला आधार ।
नाही झाली असली माउली थोर ॥१॥
जाणतअसुनी गीता वेदार्थ सगळा ।
वंचित जीवांसाठी जीव कळवळला ।
ज्ञान सोपे करुनी अनुभवही दिधला ।
पसायदाने जीव शांत हा केला ॥२॥
धाक वेदज्ञांना, पाखंडी जना ।
अव्यक्ताची सत्ता दावी सर्वांना ।
देवमार्गी कोणी मोठा ना साना ।
दिंडीने विठ्ठल भेटे सर्वांना ॥३॥
साहुनी दु:ख, बोल अज्ञ जीवांचे ।
हरिपाठे कल्याण केले सर्वांचे ।
ज्ञानेश्वरी अमृत अपुल्या भाषेचे ।
भाग्य दीना कळु दे काय हे अमुचे ॥४॥
