रचना क्र. 300
श्री रामाची आरती
श्री पेठेकाका · null
null
आरती गुणरूप रामा, निर्गुणविश्रामा ॥धृ॥
काळ कलीचा दुर्धर आम्हांवरती हा आला ।
जीवजीव भयभीत विकारांपुढती हा झाला ।
दे तव शक्ती दासा दीना जपण्या सद्धर्मा ।
सद्बुद्धीच्या अंतर्ज्योती लावियल्या धामा ॥१॥
किती युगे अन् कितीक नामे घेशी अवतार ।
तुला आणण्या आम्हाजवळी तप नाही थोर ।
परि ये सगुणी, ना तरि येई नामी रे रामा ।
पाही आशा धरुनी आम्ही घेत तुझ्या नामा ॥२॥
