रचना क्र. 299
श्री कृष्णाची आरती
श्री पेठेकाका · null
null
परमात्मस्वरूपा, जगत्सख्या श्रीकृष्णा ।
अवतारा पूर्णा, हरि रे मम भवतृष्णा ॥धृ॥
पेंद्यावरती जे, प्रेम सुदाम्या तेच ।
जो राधेचा तू , रुक्मिणिचा तू तोच ॥
उद्धवा-अर्जुना, भीष्मसखाही तूच ।
देवकी-यशोदा, परि तो नंदन तूच ॥१॥
त्या गाई-गोपी, कुब्जा असुनी दूर ।
तव लळा लागतो, ये यमुनेला पूर ॥
तव प्रतीक्षेत ते, शत्रु कंस-चाणूर ।
भक्तांच्या हृदयी, नित बासरिचे सूर ॥२॥
तुजपासुन आम्ही, कर्म शिकू की ज्ञान ।
की शस्त्रसज्जता, युद्धनीतिविज्ञान॥
उद्धारशास्त्र की, गीतामृत, निर्वाण ।
दीनास आपुले, भक्तीचे दे भान ! ॥३॥
