रचना क्र. 301
सृष्टीची आरती
श्री पेठेकाका · null
null
सृष्टीमाय तुजला आम्ही ओवाळू आरती । तुजला ओवाळू आरती ।
संदेशांचे चिंतन घडण्या देई शुद्ध मती॥धृ॥
सूक्ष्मरूप तो देव तुझ्यातुन प्रगटे या जगती । वाटे प्रगटे या जगती।
पर्वत झाडे वेली पुष्पे मनोगते गाती ॥
रुजोत त्यातिल अधोरेखिते जनीमनीचित्ती । अमुच्या जनीमनीचित्ती।
संदेशांचे चिंतन घडण्या देई शुद्ध मती ॥१॥
निसर्ग तू तो, तूच प्रकृती एकरूप होशी । अवघे एकरूप होशी ।
तुजला कळते वळते ते ते कळु दे आम्हांसी॥
संवादातुन बोध घेउनी होऊ दे प्रगती । आमुची होऊ दे प्रगती ।
संदेशांचे चिंतन घडण्या देई शुद्ध मती॥२॥
