रचना क्र. 296
पंडित तोचि एक भला
श्री तुकोबा
पंडित तोचि एक भला ।
नित्य भजे जो विठ्ठला ॥धृ॥
अवघे सम ब्रह्म पाहे ।
सर्वांभूती विठ्ठल आहे ॥१॥
रिता नाही कोणी ठाव ।
सर्वांभूती वासुदेव ॥२॥
तुका म्हणे तोचि दास ।
त्या देखिल्या जाती दोष ॥३॥
रचना क्र. 296
श्री तुकोबा
पंडित तोचि एक भला ।
नित्य भजे जो विठ्ठला ॥धृ॥
अवघे सम ब्रह्म पाहे ।
सर्वांभूती विठ्ठल आहे ॥१॥
रिता नाही कोणी ठाव ।
सर्वांभूती वासुदेव ॥२॥
तुका म्हणे तोचि दास ।
त्या देखिल्या जाती दोष ॥३॥