रचना क्र. 297
देवांची आरती
श्री पेठेकाका · null
null
देवांची आरती, लाविल्या भावांच्या ज्योती ॥धृ॥
अरूप तुम्ही, निर्गुण तुम्ही विश्वाचे आधार ।
शिवरूपे राहुनी पहाता शक्तीचा व्यवहार ।
मायामय या दीन जीवांना कशी कळे महती ॥१॥
म्हणुनी बनवुनि मूर्ती आम्ही आवाहन केले ।
विविध रुपाने तुम्ही येउनी घर पावन केले ।
कर्तव्यांत सदा घर राहो मन चरणांवरती ॥२॥
