रचना क्र. 295
शकुंतलेश्वराची आरती
श्री निरंजन रघुनाथ · null
null
जयजय शिवशंकरा कर्पुरगौरा गिरिजावराऽ हो ।
कृष्णातीरनिवासा स्वामी श्रीऽशकुंतेऽश्वराऽ हो ॥धृ॥
जटाजूट शशिभूऽषण नीऽलग्रीऽवा गंगाधराऽ हो ।
दशभुजपंचाननाऽ त्रिशूलपाणीऽ विश्वंभराऽ हो ।
पिनाकधरहरशंभुनंदिवाऽहनाऽ दीगंबराऽ हो ॥१॥
ब्राह्मणशापे मघवा होउनिया पक्षी आपणऽ हो ।
कृष्णातीरि तप केले तेणे, वृक्षाऽवऽरी बसुनीऽ हो ।
म्हणवुनि येणे केले सांडुनि कैलासा लाऽगुनऽ हो ॥२॥
अपुल्या ईक्षणमात्रे करूनि इंद्राचा उद्धाऽर हो ।
भक्तजनांच्यासाठी वसते झाले नीरंतरऽ हो ।
नीरंजन गुण गातो होउनि चरणाचा किंकरऽ हो ॥३॥
