रचना क्र. 292
जीवीच्या जीवना माझिया
श्री रंगनाथ स्वामी · null
null
जीवीच्या जीवना माझिया , गुरुराजया ॥ धृ ॥
नवविधाभजने देव ।
तोषला दावी ठाव ।
निजमोक्षा हा, हाचि उपाव ।
गुरुचरणी भाव ॥१॥
श्रुति निर्वाह हाचि वदती ।
ज्ञानेची कैsवल्यप्राप्ती ।
गुरुकृपे ज्ञानप्रतीती ।
सिद्ध विश्रांती ॥२॥
शुकसनकादिक हेही गाती ।
जनकादिक ब्रह्मादिक ध्याती ।
स्तविती रंगोनी तवचि कीर्ती ।
जय जय निजमूर्ती ॥३॥
