रचना क्र. 291
दत्ताची आरती
श्री निरंजन रघुनाथ · null
null
जय देव जय देव, जय दत्तात्रया ।
आरती ओवाळू तूझिया पाया ॥धृ॥
पंचप्राण वाती एकत्र केली ।
तुझिया नामस्मरणी घृती भिजवीली ॥
हृदयी ध्याता ध्यान प्रदीप्त झाली ।
मन हे उजळूनिया एकारत केली ॥१॥
कल्पनेचा वायू समूळ नीमाला ।
सोहंभावे दीप अक्षयी ठेऽला ।
सर्वांभूती दिगंबर प्रकाशला ।
द्वैताचा तमरज विलयासी गेला ॥२॥
सरली वाती ज्योती एकत्र जाली ।
भ्रांतीची काजळी समूळ नीमाली ।
सद्गुरुप्रसादे युक्ती फावली ।
नीरंजन धृती, स्वस्वरुपी ठेली ॥३॥
