रचना क्र. 293
क्षमा प्रार्थितो
श्री मनोहर जोशी · null
null
जरी लाभली क्षेमकारी सुजिव्हा,
न उच्चारिले नाम दत्तप्रभो ।
क्षमा प्रार्थितो दूषणांची, दयाळा,
क्षमा प्रार्थितो मी, क्षमा प्रार्थितो ॥१॥
कधी हीन योनीत मी दैवदोषे,
न उच्चारिले नाम दत्तप्रभो ।
क्षमा प्रार्थितो दूषणांची, दयाळा,
क्षमा प्रार्थितो मी, क्षमा प्रार्थितो ॥२॥
बहु कष्टलो मातृगर्भी परी मी,
न उच्चारिले नाम दत्तप्रभो ।
क्षमा प्रार्थितो दूषणांची, दयाळा,
क्षमा प्रार्थितो मी, क्षमा प्रार्थितो ॥३॥
जधी जन्म होताच अज्ञानचित्ते,
न उच्चारिले नाम दत्तप्रभो ।
क्षमा प्रार्थितो दूषणांची, दयाळा,
क्षमा प्रार्थितो मी, क्षमा प्रार्थितो ॥४॥
सदा दंग खेळात, मी बाल्यकाळी,
न उच्चारिले नाम दत्तप्रभो ।
क्षमा प्रार्थितो दूषणांची, दयाळा,
क्षमा प्रार्थितो मी, क्षमा प्रार्थितो ॥५॥
सुखे भोगता यौवनी अज्ञभावे,
न उच्चारिले नाम दत्तप्रभो ।
क्षमा प्रार्थितो दूषणांची, दयाळा,
क्षमा प्रार्थितो मी, क्षमा प्रार्थितो ॥६॥
जरेने जधी इंद्रिये क्षीण झाली,
न उच्चारिले नाम दत्तप्रभो ।
क्षमा प्रार्थितो दूषणांची, दयाळा,
क्षमा प्रार्थितो मी, क्षमा प्रार्थितो ॥७॥
हृषीकेश ! वाचा, मनो, देह योगे,
चुका जाहल्या जाणता अज्ञतः ।
क्षमा प्रार्थितो दूषणांची, दयाळा,
क्षमा प्रार्थितो मी, क्षमा प्रार्थितो ॥८॥
न केली स्तुती, ध्यान, आवाहनादि,
न केली पूजा, वंदिलो, गायिलो ।
क्षमा प्रार्थितो दूषणांची, दयाळा,
क्षमा प्रार्थितो मी, क्षमा प्रार्थितो ॥९॥
असे पातकी मी दयासिंधु दत्ता,
असे रक्षिता तूच मम बांधव ।
क्षमा प्रार्थितो दूषणांची, दयाळा,
क्षमा प्रार्थितो मी, क्षमा प्रार्थितो ॥१०॥
जसा स्थानभ्रष्टास आधार भूमी,
तसा तूच दत्ता मला वाचव ।
क्षमा प्रार्थितो दूषणांची, दयाळा,
क्षमा प्रार्थितो मी, क्षमा प्रार्थितो ॥११॥
