रचना क्र. 290
भावे हरि-नाम उच्चारिता वाचे
श्री स्वामी स्वरूपानंद · null
null
भावे हरि-नाम उच्चारिता वाचे ।
कोटी कल्मषांचे भस्म होय ॥१॥
हरिनाम मंत्र जपा अहोरात्र ।
अंतरी पवित्र तेणे तुम्ही ॥२॥
सानंद, सोल्हास करा नाम -घोष ।
तेणे भव-पाश दूर होय ॥३॥
चुके अधोगती लाभे चिर-शांती ।
जीवासी विश्रांती स्वामी म्हणे ॥४॥
