रचना क्र. 289
भगवद्गीतेची आरती
श्री निरंजन रघुनाथ · null
null
जय देव जय देव जय भगवद्गीते ।
तापत्रय संहारुनि, वारि भवदुरितें ॥धृ॥
पार्थरथावरि बसले असता भगवान ।
त्यांच्या मुखकमळातुनि जालिसि निर्माण ।
तव श्रवणाच्या योगे पंडूनंदन ।
मोहातीत होउनि, जाला पावन ॥१॥
अष्टादश अध्यायी तूझा विस्तार ।
लेखनपठणेश्रवणे, उद्धरिसी नर ।
हरिहरब्रह्मा स्तविति, तुज वारंवार ।
अगाध महिमा नकळे कवणासी पार ॥२॥
श्रीकृष्णे काढुनिया वेदांचे सार ।
प्रगट केली ब्रह्मविद्या परिकर ।
सर्वहि विश्वजनांचा केला उद्धार ।
नीरंजनपद देउनि, हरिला संसार ॥३॥
