रचना क्र. 286
मज तारिल मम राम
श्री पेठेकाका
मज तारिल मम राम । परमदयाघन ॥धृ॥
कर्तव्याचा तो जरि भोक्ता ।
परि तळमळ मम पाहिल आता ।
परमक्षमाघन ॥१॥ परमदयाघन...
त्याग तपस्या मूर्तिमंत तो ।
माझ्यामधला कण शोधिल तो ।
परमप्रेमघन ॥२॥ परमदयाघन...
अंतर्यामी किती आर्तता ।
दीना उरला रामचि त्राता ।
परमकृपाघन ॥३॥ परमदयाघन...
