रचना क्र. 285
येई ओ विठ्ठले
श्री नामदेव महाराज · null
null
येई ओ विठ्ठले माझे , माउलीये
निढळावरी कर, ठेवुनी, वाट मी पाहे ॥१॥
आलिया गेलिया हाती धाडी निरोप ।
पंढरपूरी आहे माझा मायबाप ॥२॥
पिवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ।
गरूडावरी बैसोनी, माझा कैवारी आला ॥३॥
विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी ।
विष्णुदासनामा जीवे भावे ओवाळी ॥४॥
