रचना क्र. 284
आम्हा ये प्रपंची
श्री रामदास स्वामी · null
null
आम्हा ये प्रपंची कोणी नाही सखा।
येका रघुनायका वाचुनीयां ॥१॥
विद्या वैभव धन मज कृपणाचे ।
जीवन जिवाचे आत्मारामु ॥२॥
आकाश अवचिते वरी कोसळेल ।
मज तेथे राखेल आत्मारामु ॥३॥
आपंगिले मज श्रीरामसमर्थे ।
ब्रह्मांड पालथे घालूं शके ॥४॥
रामदास म्हणे मी शरणागत त्याचा ।
आधार सकळांचा मुक्त केला ॥५॥
