रचना क्र. 283
माझिये मनीचा जाणा हा निर्धार
श्री तुकोबा · null
null
माझिये मनीचा जाणा हा निर्धार ।
जिवासि उदार जालो आता ॥१॥
तुजवीण दुजे न धरी आणिका ।
भय लाज शंका टाकियेली ॥२॥
ठायीचा संबंध तुज मज होता ।
विशेष अनंता केला संती ॥३॥
जीवभाव तुझ्या ठेवियेला पायी ।
हेचि आता नाही लाज तुम्हा ॥४॥
तुका म्हणे संती घातला हवाला ।
न सोडी विठ्ठला पाय आता ॥५॥
