रचना क्र. 271
कृष्णे कृपा मजवरी फार
श्री कृष्णदास महाराज · null
null
कृष्णे कृपा मजवरी फार ॥धृ॥
अखिल जनाते पुनित कराया,
जलरूपी अवतार ॥१॥
स्नान पान तू प्रेमे करविसि,
थोर तुझा आधार ॥२॥
व्याधि हराया अमृत होसी,
घेऽसी माझा भार ॥३॥
आधि हराया चिद्गंगा होसि,
करविसि तू भवपार ॥४॥
तुझे ध्यान ते धावत भेटे,
लाटा भक्ताकार ॥५॥
व्यासहि बोले ऐक्यरूपे जो,
हरिहर हा अवतार ॥६॥
गुरुमाता तू सर्वहि अससी,
ऐसा नामोच्चार ॥७॥
कृष्णा हा तुज अनन्यभावे,
स्मरतो वारंवार ॥८॥
