रचना क्र. 270
येउनीया वास करिसी हृदयी
श्री तुकोबा · null
null
येउनीया वास करिसी हृदयी ।
ऐसे घडे कई कासयाने ॥धृ॥
न कळता काय, करावा उपाय ।
जेणे राहे भाव, तुझ्या पायी ॥१॥
साच भावे तुझे, चिंतन मानसी ।
राहे हे करिसी, कै गा देवा ॥२॥
लटिके हे माझे, करूनीया दूरी।
साच तू अंतरी, येउनी राहे ॥३॥
तुका म्हणे मज, राखावे पतीता ।
आपुलिया सत्ता, पांडुरंगा ॥४॥
