रचना क्र. 243
मनुजा, राम सदा वद रे
श्री निरंजन रघुनाथ · null
null
मनुजा, राम सदा वद रे ॥धृ॥
भ्रमदायक जग सर्वही मानुनी ।
माया आस दरे ॥१॥
कामादिक रिपु दंडुनि अंतरि ।
सांडी दुर्मद रे ॥२॥
सावळी सुंदर मूर्ति हरीची ।
ध्याई मनि आदरे ॥३॥
रघुविर अक्षयी देईल तूते ।
निरंजनपद रे ॥४॥
