रचना क्र. 238
कुग्रामीचा वास
श्री रामदास स्वामी · null
null
कुग्रामीचा वास, आयुष्याचा नाश ।
विद्येचा अभ्यास, तेथे कैचा ॥१॥
तेथे कैचा देव, तेथे कैचा धर्म ।
कैसे कर्माकर्म, कळेचिना ॥२॥
कळेना परीक्षा, चातुर्यमर्यादा ।
लागतसे सदा, पोटधंदा ॥३॥
पोटधंदा नीच, जनांची संगती ।
तेथे कैची गती, विवेकाची ? ॥४॥
विवेकाची गती, सज्जनसंगती ।
दास म्हणे स्थिती, पालटावी ॥५॥
