रचना क्र. 239
सुखदु:ख ही
श्री पेठेकाका · null
null
सुखदु:ख ही । प्रभु तव माया ॥ धृ ॥
काळ करामत। दिसत न कोठे ।
कधि ग्रासे हा । अवघ्या काया ॥१॥
वस्तु सुखाची । देते दु:खा ।
दुःखद कशि कधि । सुखवित हृदया ॥२॥
सत्य कसे हे । जग बदले जे ।
क्षणामध्ये जे । जाते विलया ॥३॥
दीन म्हणे प्रभु । निरसा माया ।
देह ही छाया । मन पडछाया ॥४॥
