रचना क्र. 228
हे तो त्याचा तोचि जाणे
श्री माणिकप्रभू · null
null
हे तो त्याचा तोचि जाणे ।
येरवी ते काय बाणे ? ॥धृ॥
येथे पाहिजे दैवाचे ।
इतरांसी लाभ कैचे ? ॥१॥
दर्दुरी कमल संबंधी ।
परि भृंगचि घेतो सुगंधी ! ॥२॥
गोचिडासी काय क्षीर ।
त्याचे भक्ष्य असे रुधिर ! ॥३॥
म्हणे माणिक वस्तुची खूण ।
न कळे सद्गुरूवाचून ! ॥४॥
