रचना क्र. 223
शेवटची हे मागणी
श्री तुकडोजी महाराज
शेवटची हे मागणी ।
चित्त राहो रामचरणी ॥धृ॥
धन्य होईन अंकित ।
कृपा करा तुम्ही संत ॥१॥
बहु तारियेले भक्त ।
करा विषयी अनासक्त ॥२॥
हेचि मागतो मी जोडी ।
चरण विसरे न घडी ॥३॥
तुकड्या म्हणे जन्मवरि ।
अहोरात्र तुम्हा स्मरी ॥४॥
