रचना क्र. 222
शरणागत असता का हो उपेक्षिता
श्री गोंदवलेकर महाराज · null
null
शरणागत असता का हो उपेक्षिता ।
तुम्हावीण त्राता दुजा नाही ॥धृ॥
जगी मीच एक पापी जन्मा आलो ।
माझी का हो करुणा तुम्हा न ये ॥१॥
रामा तुझे पायी अनन्य शरण ।
धरिले ते चरण न सोडी आता ॥२॥
दास म्हणे आता पडिलो विपत्ती ।
सदा माझे चित्ती राम वसो ॥३॥
