रचना क्र. 221
शक्तिला भक्तीचे परिमाण
श्री पेठेकाका · null
null
शक्तिला भक्तीचे परिमाण ।
आम्हा मारुतिराय प्रमाण ॥धृ॥
जन्मांतरिचा देव भेटता ।
सगुणरुपाने राम प्रकटता ।
अर्पी पंचप्राण ॥१॥
अचाट शक्ती, अपार युक्ती ।
परी नम्रता, अपूर्व भक्ती ।
दास्य हाचि सन्मान ॥२॥
गदा घेउनी तत्पर असशी ।
रामकार्य हा ध्यास मानसी ।
जीवित देशी दान ॥३॥
कसे करावे दास्य कुणाचे ।
दाविशि दीना मार्ग मुक्तिचे ।
नाम मिळविशी दान ॥४॥
