रचना क्र. 220
शक्तिबुद्धिधनधीरबळे कुणि
श्री पेठेकाका · null
null
शक्तिबुद्धिधनधीरबळे कुणि
कशावरी जगतो ।
आम्ही नामबळे चालतो,
जगतो, नामबळे बोलतो ॥धृ॥
कर्तृत्वाने नमविति विश्वा,
‘मी’ न नमविता येतो ।
तोच न उरतो नामबळे अम्ही,
जग पुसुनी टाकतो, लीलया ॥१॥
देहसुखाचे घडण्या प्राणी
रात्रंदिन राबतो ।
प्रारब्धावरि देह टाकुनी,
नामबळे हासतो, राहतो ॥२॥
नामचि खातो, नाम प्राशितो
नामावर जगतो ।
दीन म्हणे अम्ही नामकृपेने,
सार्थकही साधितो, जिवाचे ॥३॥
