रचना क्र. 219
अगाध तव गुण-महिमा
श्री निरंजन रघुनाथ · null
null
अगाध तव गुण-महिमा ।
जयजय बलभीमा बलभीमा ॥धृ॥
वंदुनिया श्रीरामा केली निजबळ तू बळसीमा ॥१॥
सीताशोक निवारुन-केले लंकापुरिच्या दहना ॥२॥
द्रोणाचर गिरि आणिला-बंधु लक्ष्मण वाचविला ॥३॥
निरंजन तव पायी-भावे, ठेवित येउनि डोई ॥४॥
