रचना क्र. 216
मी नेणे मला कैसा तारिल राम?
श्री माणिकप्रभू · null
null
मी नेणे मला कैसा तारिल राम ? ॥धृ॥
कपटी पापी अन्यायी कुटिल बहु ।
वसत सदा मम हृदयी काम ॥१॥
भजन पूजन भक्ती स्वप्नीही नेणे ।
प्रेम कैसे वाचेसि नाम ॥२॥
माणिक म्हणे मी अधमाहूनी अधम ।
पावन करील तरी पावेन विश्राम ॥३॥
