रचना क्र. 215
मन विस्तारी थोडे, मनुजा
श्री पेठेकाका · null
null
मन विस्तारी थोडे, मनुजा ।
देव सोयरा करी ॥धृ॥
स्वार्थाच्या कोशात निरंतर ।
जगाकडुन सुख हवे जन्मभर ।
जगती वाटे मीच बरोबर ।
प्रतिक्षणी का स्वत:स घेशी, अशांति रे पदरी ? ॥१॥
भावशून्यता, तशा वासना ।
अहंपूर्तिच्या कृती, कल्पना ।
किती करी तू जगी वल्गना ।
फोल मृत्यु पलिकडे तया नच, किंमत देवाघरी ! ॥२॥
मनुष्यत्व ही झेप न साधी ।
क्षुद्रपणाची टाक उपाधी ।
देवकार्य ही घेई संधी ।
मना, तारुनी नेई दीना, जना तसे उद्धरी ! ॥३॥
