रचना क्र. 200
नाम मुखी मेवा आणि हाती संतसेवा
श्री पेठेकाका · null
null
नाम मुखी मेवा आणि हाती संतसेवा ।
वर्णावा त्या जीवा किती काय ॥धृ॥
शुद्ध मार्गे जाय कर्म ‘भक्ती’ होय ।
वाचा गुण गाय देवाचेेच ॥१॥
मालक जो झाला देहप्रपंचाला ।
पैसाही जिंकिला केला दास ॥२॥
प्रतिष्ठा मानाला कधी ना भुकेला ।
जगाला ना भुलला थोर होय ॥३॥
त्याची गाऊ कीर्ती तो खरा भूपती ।
दीन म्हणे मुक्ती त्याचे हाती ॥४॥
