रचना क्र. 188
जेणे अंतरती हरी तुझे पाय
श्री स्वामी स्वरूपानंद · null
null
जेणे अंतरती हरी तुझे पाय ।
करावे ते काय चमत्कार ॥धृ॥
कशासाठी व्हावी वश ऋद्धिसिद्धी ।
नावाची प्रसिद्धी कशासाठी? ॥१॥
मज तृणवत् गमे हे प्राकृत ।
आहे आत्महित तुझे पायी ॥२॥
स्वामी म्हणे माझे एक तू निधान ।
नाही समाधान तुजविण ॥३॥
