रचना क्र. 187
जीवनाची मासोळी काढता बाहेरी
श्री स्वामीसुत महाराज
जीवनाची मासोळी काढता बाहेरी ।
कैसा वाचे तरी जीव तिचा ॥धृ॥
स्वामीराया तैसे माझे तू जीवन ।
सोडोनी निधान कैसे राहू ? ॥१॥
म्हणोनिया आता करा हीच सोय ।
दाखवावे पाय नित्य तुझे ॥२॥
स्वामीसुत म्हणे तू माझे जीवन ।
खरे ते चरण तुझे बापा ॥३॥
