रचना क्र. 177
कळो आली शांती वासना निमाली
श्री अवधूत महाराज · null
null
कळो आली शांती वासना निमाली ।
उन्मनी भोगिली याच देही ॥धृ॥
याच देही आहे त्रिवेणी संगम ।
ज्ञानाचा उगम संत जाणे ॥१॥
संतांसी नमन भक्तिभावे करा ।
रज तम सारा घालवी जो ॥२॥
घालवील पाप अनंत योनींचे ।
गुण गाऊ त्याचे आवडीने ॥३॥
आवडीने माता रक्षी बाळकासी ।
तैसे मोरयासी सांभाळावे ॥४॥
