रचना क्र. 178
का रे मना हरिनाम न स्मरसी?
श्री माणिकप्रभू · null
null
का रे मना हरिनाम न स्मरसी? ।
लोभ लालूच ममतेमध्ये मरसी ! ॥ धृ॥
करिसील वाचे कोणाची निंदा ।
हरिभजना मागे का सरसी ॥१॥
रक्षिले कोणी गर्भवासी तुज ।
अरे मना मूढा तया विसरसी ! ॥२॥
माणिक म्हणे मना सावध होऊनि ।
जाय गुरूसी शरण त्वरेसी ! ॥३॥
